261 फुकट्या प्रवाशांकडून एक लाख 35 हजारांचा दंड वसुल

0

मनमाड रेल्वे स्टेशनवर रेल्वे पथकाची विशेष तपासणी मोहीम

भुसावळ- मध्य रेल्वेच्या मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 261 प्रवाशांकडून एक लाख 35 हजार 515 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेमुळे फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सहाय्यक वाणिज्य प्रबधंक (गुड्स) अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

30 तिकीट निरीक्षकांसह सहा कर्मचार्‍यांचा सहभाग
विशेष मोहिमेत पथकात 30 तिकीट निरीक्षकांसह सहा रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले. विना तिकीट प्रवास करणार्‍या 111 प्रवाशांकडून 56 हजार 605 रुपयांचा दंड, रीझर्व्ह डब्यातून आरक्षण नसताना प्रवास करणार्‍या 150 प्रवाशांकडून 78 हजार 910 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे बी.एस.महाजन, डी.एम.घुमरे, एस.ए.वाघ, एस.ए.बोधे, एस.एन.जाधव, पियूष कुमार, एस.एस.जाधव, एम रफिक, एम.के.श्रीवास्तव, आर.के.केसरी, सी.डी.कांठे, विवेक भाटी, पी.पाटील, एस.एम.पुराणिक, आर.खरे, एम.पी.नजारकर, एस.ए.दहिभाते, एन.पी.महाजन. एस.एन.चौधरी व अन्य तिकीट कर्मचारी सहभागी झाले.