27 हजारांचे शेती साहित्य चोरीला

Agricultural materials worth 27,000 were stolen from Kasarkheda Shiwar यावल : तालुक्यातील कासारखेडा शिवारातील शेतातून शेतकर्‍याचे 27 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी मंगळवारी रोजी रात्री लांबवली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार गुलाम मुस्तफा गुलाम दस्तगीर (60, खिर्णीपूरा, यावल) यांची कासारखेडा शिवारात गट क्रमांक 69 मध्ये शेती आहे. शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरट्यांनी मंगळवारी रात्री तीन हजार पाचशे रुपये किंमतीची बॅटरी, दिड हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार, चार हजार रुपये किंमतीच्या दोन बकर्‍या, पाच हजार रुपये किंमतीची केबल वायर व अन्य शेतीचे साहित्य मिळून 27 हजार 500 रुपये किंमतीचे शेती साहित्य लांबवले. अज्ञात चोरट्यांविरोधात शेतकर्‍याच्या तक्रारीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय अजीज शेख करीत आहेत.