27 हजारांच्या बडग्या वड्रीतून जप्त

0

यावल वनविभागाची दुसर्‍या दिवशी धडक कारवाई

यावल- तालुक्यातील वड्री येथील मोटकर्‍या भागातून 26 हजार 500 रुपये किंमतीच्या सलई जातीच्या तयार बडग्या यावल वनविभागाच्या पथकाने जप्त केल्या. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वड्री येथील एका उसाच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनरक्षक एस.एस.माळी, जे.व्ही.ठाकरे, एस.टी.पंडित, वाहन चालक वाय.डी.तेली यांच्या पथकाने ही कारवाई केली.