लंडन । येथील 27 मजली इमारतीला भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी सकाळी आग लागली टॉवरमध्ये शेकडो लोक अडकले असून अग्निशमन दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
जीवाच्या आकांताने खिडक्यांमधून उड्या
जीव वाचवण्यासाठी टॉवरमधील लोकांनी अक्षरश: खिडक्यांमधून उड्या मारल्या. वेस्ट लंडनमधील ग्रेन फेल टॉवर या इमारतीत एकूण 120 फ्लॅट आहेत. यात जवळपास 200 जण राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. धूरात गुदमरुन अनेक जण अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी यंत्रणेवर ताण पडला.