पॅरीस । 28 मे ते 11 जून दरम्यान येथील रेड क्लेकोर्टवर होणार्या फ्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून स्वित्झर्लंडचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने माघार घेतली आहे. फेडररने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. 2017 च्या टेनिस हंगामातील ही दुसरी ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी आपण अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याने फ्रेंच ओपनमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे फेडररने स्पर्धा आयोजकांनी कळविले आहे. फेडररने गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकल्यानंतर जवळपास सहा महिने तो टेनिसपासून अलिप्त राहणार आहे.