नवी दिल्ली- गुड्स एंड सर्विस टॅक्स (जीएसटी)बाबत बोलतांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २८ टक्क्यांचा स्लॅब समाप्त होत आहे. भविष्यात जीएसटीचे सिंगल स्टॅडर्ड रेटवर काम होणार असल्याचे सांगितले. शनिवारी जीएसटी काउंन्सीलची ३१ वी बैठक झाली त्यात ३३ वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले. २८ टक्के जीएसटी स्लॅबमधील ६ वस्तू कमी झाल्या आहेत. केवळ २८ वस्तू शिल्लक राहिल्या आहेत. त्यादेखील हळूहळू कमी होणार आहे.
हळूहळू जीएसटी दर कमी करून सामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे जेटली यांनी सांगितले.