प्रमाणकांच्या मदतीने गणित अध्यापन व्हावे : केदार

0

नंदुरबार । प्राथमिक स्तरावरील गणित विषयाचे अध्यापन अमूर्त स्वरूपात न होता, प्रमाणकांच्या मदतीने गणिताची दृष्य स्वरूपात मांडणी होणे विद्यार्थ्यांचे मुलभूत संबोध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन सुलभक उदय केदार यांनी केले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था, नंदुबारच्या वतीने इ. 1 ली ते 5 वी ला शिकविणार्‍या शिक्षकांसाठी श्रॉफ हायस्कुल नंदुरबार येथे गणिश संबोध प्रगल्भीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.डी.कांबळे, जिल्हा गणित समन्वयक शिवाजी ठाकुर व सुलभक रवीकिरण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे गणितातील मुलभूत संबोध स्पष्ट करण्यासाठी नैसर्गिक व शास्त्री अध्यापन पद्धतींवर चर्चा करण्यात आली. उपस्थित शिक्षकांनी आपल्या अध्यापनातील नाविण्यपूर्ण बाबींचे सादरीकरण केले.