286 आमदारांनी घेतली शपथ; अधिकृत आमदार म्हणून शिक्कामोर्तब !

0

मुंबई: अखेर राज्यात स्थायी सरकार मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 286 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. कालिदास कोळंबकर यांना मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.

14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. सभागृहात आज अनेक नवनिर्वाचित आमदार जे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात आले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे.