0

रावेर। बुध्द, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवित संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करीत असतांना समाजातील अंधश्रध्दा अनिष्ठ रूढी परंपरा दुर होण्यासाठी समाज प्रबोधन करतांना अंधश्रध्देला विरोध करणार्‍या सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबई येथील नायगांव येथे बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम करीत असतांना झालेल्या प्राणघातक भ्याड हल्याचा निषेध करीत तहसिलदार यांना सर्वपक्षीय निवेदन दिले.

हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी
अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्ती, शैक्षणिक जागृतीवर महाराज बोलत असतात, हा हल्ला पुरोगामी विचारांवर झालेला आहे. त्या गुंड प्रवृत्तीच्या सर्व गुंडांना कठोर शासन करण्यात यावे असे येथील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे नमूद केले आहे. हल्लेखोरांवर कठोर कार्यवाई न झाल्यास तिव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन तहसिलदार विजयकुमार ढगे यांना देतांना दिलीप कांबळे, मुलनिवासी पार्टी अध्यक्ष बाळु शिरतुरे, भारीप बहुजन महासंघ तालुकाध्यक्ष राजु सवर्णे, युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष जगदीश घेटे कॉग्रेस उपाध्यक्ष, राजेंद्र अटकाळे अध्यक्ष फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे दिपक तायडे, भारीप बहुजन महासंघ युवक तालुकाध्यक्ष सदाशीव निकम, के.सी. गाढे, मिलिंद पाटील, राजू तडवी, शालीक सवर्णे, सचिन महाले, जगदीश घेटे, राजेंद्र इंगळे, संघरत्न दामोदरे, विजय भोसले, विजय अवसरमल, प्रदीप तायडे, सिताराम तायडे, कडू तायडे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.