29 जुलैला तिसरी यादी

0

पुणे । पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तिसर्‍या प्रवेश फेरीसाठी 44 हजार 650 जागा उपलब्ध असून, 35 हजार 173 अर्ज तिसर्‍या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अकरावी प्रवेशाच्या दोन फेर्‍या पूर्ण झाल्या असल्या असून तिसर्‍या फेरीला सुरुवातझाली आहे. तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे.