मुंबई : राज्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. या कालावधीमध्ये 291 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 61 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली तर 291 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली. तसेच एकूण 240 जणांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात आली, असल्याचे सहारिया यांनी सांगितले.