3 लाख चोरणारे बारा तासांत अटकेत

0

पुणे । बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याच्याकडील तीन लाखांची रोकड लंपस केल्याची घटना काल (शनिवार) बाणेर येथे भरदिवसा घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत मुद्देमालासह अटक केली. पोलिसांनी तिन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रमोद व्यकंटेश तेलगु (वय 19), योगेश धनराज द्रविड (वय 22), उमेश आदिनारायण बोया (वय 19 तीघे ही राहणार शितळानगर, देहुरोड) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 2) दुपारी उमेश कदम (वय, 30) हे एस.बी.आय बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असता तीन चोरट्यांनी दुचाकीवरुन येवून कदम यांच्या डोक्यात दडग घातला व त्यांच्या हतातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम असेली बॅग पळवली. या गुन्ह्याचा तपास करत असताना शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ताथवडे येथील अशोकनगर परिसरात एका दुचाकीवर तीन जण संशयीतरीत्या फिरताना पोलिसांना अढळले. त्यांच्या गाडीचा क्रमांक हा वरील गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकीशी मिळत-जुळता होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबुल केले.

पोलिसांची यशस्वी कारवाई
ही कारवाई गुन्हे दरोडा प्रतिबंधक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस उप निरीक्षक संजय दळवी, यशवंत आंब्रे, विनायक पवार, निलेश पाटील, महेश कदम, सचिन गायकवाड, दत्तात्रय काटम, अजय थोरात, मल्लिकार्जून स्वामी, रामदास गोणते, बशीर सय्यद, परवेज जमादार व प्रविण जाधव यांनी केली.