3 षटकाचा खेळ शिल्लक असताना पावसाचा व्यत्यय; चाहत्यांची निराशा !

0

मँचेस्टर: २०१९ विश्वचषक स्पर्धेत ज्या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. रविवारी 16 रोजी मँचेस्टरच्या मैदानावर दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले. भारतीय फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली असून 46.2 षटकाची खेळ झाला असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना थांबवावा लागला आहे. भारतीय संघाने 305 धावा केले आहे. त्यात रोहित शर्माने 140 धावा केल्या आहे.