3 अतिरेक्यांना कंठस्नान, 1 लष्करी अधिकारी शहीद

0

कोहिमा – नगालॅन्डच्या मौन जिल्ह्यात प्रादेशिक लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी दोन ठिकाणी जोरदार चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी 3 अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. तसेच अतिरेक्यांच्या गोळीबारात 1 लष्करी अधिकारी शहीद झाले तसेच 3 जवान जखमी असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुगणलायात दाखल करण्यात आले आहे.

लष्करी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तिजित परिसरात मंगळवारी रात्री नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नगालॅन्ड (छडउछ-घ) आणि आसाम रायफल्समध्ये अचानक चकमक उडाली. आसाम रायफल्सच्या एका पथकाला छडउछ (घ) कॅडरचे सदस्य दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. त्याच आधारे 11 वाजता मारलेल्या धाडीनंतर ही चकमक सुरू झाली. दोन्हीकडून कित्येक तास सुरू राहिलेल्या या चकमकीनंतर 3 अतिरेक्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर, दुसरीकडे लेमपाँग आणि उटिंग येथे णङऋ- आणि छडउछ (घ) अतिरेक्यांमध्ये झालेली चकमक बुधवारी दुपारपर्यंत सुरूच आहे.