ब्लड प्रेशर हा आजार आता सर्वत्र पसरला आहे. याला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. जेव्हा हृदयातील रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो, तेव्हा अवयवांपर्यंत रक्त पुरवठा करण्यासाठी दाब वाढतो, त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. डोक दुखणे, चक्कर आणि छातीत धडधडणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
उच्च रक्त दाब हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. त्यामुळे या आजाराने पीडित रुग्णाला रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. जर असे घडलले नाही, तर शरीरातील अवयवांना नुकसान होते. त्यातून हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड खराब होणे यांच्यासारखे आजार होण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक तणाव, अनियमित झोप इत्यादी कारणे या आजारामागे असतात. मात्र खजुराच्या सेवनाने रक्तदाबाचा आजार नियंत्रणात करणे शक्य होणार आहे. कारण खजुरात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रोटीन असतात. बी1, बी2, बी3, बी5, ए1 आणि अन्य व्हिटॅमिनही यातून मिळतात.