3 तासपेक्षा अधिक काळ चालली आइस हॉकीची लढत

0

हमर। नॉर्वे लीगमध्ये स्टारहमर डे्ंरगस आणि स्पार्टा वॉरियर्स यांच्यातील आईस हॉकीचा सामन्याने 80 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.या दोन्ही संघात प्ले ऑफ हॉकीचा सामना खेळला गेला.ही सर्वात मोठी मॅरेथॉन लढत ठरली आहे. युरोपच्या दोन अव्वल आइस हॉकी क्लब संघांमधील हा सामना 237 मिनिट 14 सेकंद म्हणजेच 3 तास 37 मिनिटांपेक्षा अधिक रंगला होता.

प्रेक्षकांची मोठी गर्दी
आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर पाहण्याची चाहत्यांना ही सर्वात मोठी संधी मिळाली. याशिवाय या सामन्याने नव्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी डेट्रायट रेड विंग्ज आणि माँट्रियल मरून्स संघांनी मॅरेथॉन लढतीचा विक्रम केला होता. 1936 मध्ये या खेळातील अव्वल दोन क्लबने लीग एनएचएलमध्ये 176 मिनिट 30 सेकंदांपर्यंत लढत दिली होती. या मॅरेथॉन लढतीमध्ये डेट्रायट रेड विंग्ड टीमने 1-0 ने विजय संपादन केला. स्ट्रारहमर आणि स्पार्टा यांच्यातील सामना निर्धारित 60 मिनिटांच्या वेळेत 1-1 ने बरोबरीत राहिला होता.

विजयासाठी अतिरिक्त वेळ
विजेत्याचा निर्णय अतिरिक्त वेळेत घेण्याचे ठरवले.आठव्या ओव्हरटाइममध्ये निकाल लागला. स्टारहमरने स्पार्टा वॉरियर्सला 2-1 ने पराभूत केले. बरोबरीत सामना असल्यास ओव्हरटाइमचा आधार प्ले ऑफमध्ये दोन्ही संघ निर्धारित वेळेत बरोबरीत राहिल्यास सामन्याच्या निकालासाठी ओव्हराटाइमचा आधार घेतला जातो. यात 20 मिनिटांचा एक ओव्हरटाइम असतो. यातही दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले तर ओव्हरटाइम पुन्हा घेण्यात येतो.