3 महिन्यात 96 लाखाचा दंड वसुल

0

जळगाव। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैधरित्या वाहतुक होत आहे. प्रशासन अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. एप्रिल ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत अवैधरित्या गौण खनीजाची वाहतुक करणार्‍या 494 वाहनावर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

तीन महिन्यात 96 लाख 54 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात वाळूच्या तीनशे वाहनाच्या वाहतुकदाराकडून 51 लाख 44 हजार, मुरुमाच्या 64 वाहतुकदाराकडून 5 लाख 80 हजार, माती 80 वाहतुकदाराकडून 4.77 लाख, दगडाची अवैधरित्या वाहतुक करणार्‍या 50 वाहनावर 34.53 लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गौण खनीकर्म अधिकारी दिपक चव्हाण यांनी दिली. अवैधरित्या वाळू वाहतुक करणार्‍या 48 जणांविरुध्द तर दगडाची वाहतुक करणार्‍या 1 वाहतुकदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनशे वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.