महाभारत काळात असेही शस्त्रास्त्रे अस्तित्वात होती, ज्यंच्यामध्ये काही मिनिटांत संपूर्ण सैन्य, देश उद्धवस्त करण्याची ताकद होती. महाभारत ग्रंथ वाचल्यानंतर त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, युद्धाच्या दरम्यान कुणीही ब्रह्मास्त्राचा वापर करायचा नाही, असा नियम बनवण्यात आला होता. द्वापार युगात ब्रह्मास्त्र हे एकमेव असे शस्त्र होते ज्याच्यात संपूर्ण विश्व नष्ट करण्याची त्यात क्षमता होती. ब्रह्मास्त्र नावाचे हे शस्त्र आजच्या अणुबाँबपेक्षा अधिक शक्तीशाली समजले जाते. महाभारताच्या काळात कोण-कोणत्या योद्ध्यांनी ब्रह्मास्त्राचा वापर केला होता.
अश्वत्थामा – महाभारत युद्धाच्या दरम्यान अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. त्यावेळी विश्वाचा विनाश होण्यापूर्वीच अर्जुनाने त्याच्याकडील ब्रह्मास्त्राचा वापर करून त्या ब्रह्मास्त्राची मारक क्षमता नष्ट केली होती.
अर्जुन – अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा वापर केल्यानंतर अर्जुन हा दुसरा यौद्धा होता, ज्याने या शस्त्राचा वापर केला होता. जेव्हा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, तेव्हा त्याला मारक म्हणून अर्जुनाने त्याच्याकडील ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. महाभारतामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. जेव्हा अश्वत्थामा आणि अर्जुन या दोघांचे ब्रह्मास्त्र एकमेकांना धडकले, तेव्हा अंतराळात प्रचंड मोठा प्रकाश निर्माण झाला. ज्यातून हजारो सूर्यांची निर्मिती झाली असावी. त्यातून निर्माण झालेल्या उष्णतेने सैनिकांच्या शरीरावरील त्वचा जळाली.
हे देखील वाचा
कर्ण – दाणशूर कर्णाकडेही ब्रह्मास्त्र होते. महाभारतामध्ये लिहिलेल्या संदर्भानुसार दुर्योधनाने त्यांचे मित्र कर्ण याला जेव्हा ब्रह्मास्त्र चालवण्याचे सांगितले, मरत्र तेव्हा कर्णाने युद्धातील नियमांचा हवाला देत हे शस्त्र चालवण्यास नकार दिला होता.
द्रोणाचार्य – कौरव आणि पांडव यांचे गुरू द्रोणाचार्य यांच्याकडेही ब्रह्मास्त्र होते. त्यांनीच अश्वत्थामा आणि अर्जुन यांना या शस्त्राचा वापर करण्याचे शिक्षण दिले होते. त्यामुळे द्रोणाचार्य यांच्याकडेही ब्रह्मास्त्र होते.
भीष्म पितामह – महाभारताामध्ये सर्वात मोठे योद्धा म्हणून भीष्म पितामह यांचा उल्लेख आहे. त्यांच्याकडेही ब्रह्मास्त्र होते. या ग्रंथामध्ये असेही म्हटले आहे की, भीष्म पितामह यांनी ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा विचार केला, तेव्हाही युद्धातील नियमांमुळे त्यांनी त्यावर कृती केली नव्हती.