नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाल्याने हवाई दलाची ताकत कैक पटीने वाढली आहे. फ्रान्सकडून भारताने ३३ राफेल मागीविल्या आहेत. त्यापैकी पाच राफेल विमाने जुलैमध्ये हवाई दलात दाखल झाल्या. २८ जुलैला पहिली तुकडी दाखल झाली होती. मोठ्या दिमाखदार सोहळ्याने राफेलचे स्वागत करण्यात आले होते. दरम्यान राफेलची दुसरी तुकडी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवाई दलात दाखल होणार आहे. तीन ते चार लढाऊ विमाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत. हरियाणातील अंबाला विमानतळावर ही विमाने दाखल होणार आहे. राफेल करारावरून सुरुवातीपासूनच केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहेत. कॉंग्रेसने राफेल घोटाळा झाल्याचे आरोप केले आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेले होते.