३ जणांना भौतिकशास्त्राचा नोबेल

0

न्युयोर्क- जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारावर जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार भौतिकशास्त्रासाठी दिला असून ३ जणांना तो देण्यात येणार आहे. आर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात आला आहे. यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागली असून डोना स्ट्रीक्लंड असे त्यांचे नाव आहे. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

सोमवारी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर आज भौतिकशास्त्रासाठीचे नाव जाहीर करण्यात आले. आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.