30 फूट उंचीवरून एअर होस्टेस विमानातून पडल्या खाली

0

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाची कर्मचारी आज सकाळी विमानातून खाली पडल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उभे असताना हा प्रकार घडला. हर्षा लोबो असे या कर्मचाऱ्याचे नाव असून बोईंग 377 विमानाचा दरवाजा उघडताना त्या खाली पडल्या. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 30 फूटांवरुन पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. एअर इंडियाचे एआय 864 हे विमान दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. ‘विमानाच्या उड्डाणाआधी त्यांनी एल 5 दरवाजा उघडला. त्यावेळी त्या खाली पडल्या.