जळगाव : 30 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची तालुक्यातील नशिराबाद येथील भवानीनगर येथे सोमवारी घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चेतन बळीराम खारोटे (30, भवानी नगर, नशिराबाद) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
राहत्या घरात आत्महत्या
नशिराबादमधील भवानी नगरात चेतन खारोटे या तरुणाने राहत्या घरात सोमवारी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार गजानन देशमुख हे करीत आहेत.