नंदुरबार : वेतनवाढ न थांबण्यासाठी 30 हजारांची लाच मागणार्या नंदुरबार जिल्हा परीषदेतील लघू सिंचन विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याची घटना जिल्हा परीषदेत शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. अनिल आत्माराम ठाकरे (40) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे व पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी केली.