30 मे रोजी औषध दुकानदारांचा राज्यव्यापी बंद

0

जळगाव । ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट यांनी 30 मे रोजी राज्यव्यापी बंद घोषित केला आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील 11 औषधी दुकाने सुरु ठेवण्यात येणार असल्याचेही या विभागाने कळविले आहे. या संपात शहरातील बहुतांश दुकाने बंद राहतील.

प्रशासनाचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष
खाजगी रुग्णालये व वैद्यकिय व्यावसायिकांनी पुरेसा औषधसाठा त्यांचेकडे ठेवण्याच्या सूचना देण्यांत आलेल्या आहेत. प्रशासनातर्फे बंद काळात स्वतंत्र नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.नियंत्रण कक्षाचा पत्ता व संपर्क क्रमांक, अन्न व औषध प्रशासन, आंबेडकर मार्केट, पहिला मजला, जळगाव, दुरध्वनी क्रमांक 0257-2217476 असा आहे.औषध निरीक्षक म.बा.कवटीकवार-9028866959, म. नं. अय्या 8888806825 आणि जे.एम. चिरमेल- 8779652880 हे नियंत्रण कक्षात उपस्थित राहतील, अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील – भारत मेडीकल (पोलन पेठ), सुयश मेडीकल (बहिणाबाई उद्यान चौक), सोलॅस मेडीकल (चित्रा चौक), इंद्रायणी मेडीकल (अयोध्या नगर), सीमा मेडीकल (मेहरुण), सागर मेडीकल (पिंप्राळा), डे- नाईट मेडीकल (सिव्हिल हॉस्पिटल जवळ), न्यु अन्यना मेडीकल (ऑर्किड हॉस्पिटल), इंडो अमेरीकन हॉस्पिटल मेडीकल, गणपती मेडीकेअर, (गणपती हॉस्पिटल), आकाश मेडीका (चिरायू हॉस्पिटल) ही दुकाने सुरु राहणार आहेत.