30 मे ला बारावीचा निकाल

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज 30 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येईल आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बारावी निकालाबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती. त्यामुळे विद्यार्थी, पालक गोंधळून गेले होते. अखेर रविवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार सोमवारी मंडळाने निकालाची तारिख जाहीर केली. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 28 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी जवळपास 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.