30 विधवा महिलांना धनादेश वाटप

0

भुसावळ । मुस्लिम मनियार बिरादरी व शेख फाऊंडेशन मुंबई यांच्या विद्यमाने समाजातील विधवांना मनियार हॉल येथे चीफ ट्रस्टी मुश्ताक हैदर शेख व इतर मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून धनादेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक हाजी साबीर शेख होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुल्ला टेलर, नबी, साजीद रोशन, अबरार खलील, अफसर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अखतर रसुल यांनी तर आभार सादिक यांनी मानले.