भुसावळ– राष्ट्रीर पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत 28 जानेवारीला पहिल्रा टप्प्रात शहर व तालुक्रातील सुमारे 30 हजारांवर बालकांना पोलिओचा पहिला डोस देण्यात आला. रविवारी सकाळी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते म्युन्सीपल हायस्कूलमध्ये बालकाला पल्स पोलिओ देऊन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.नृपाली सावकारे यांच्यासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच आरोग्य समिती सभापती मेघा वाणी यांच्या हस्ते विठ्ठल मंदिर वॉर्डात मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. शहरात 90 बुथ, 18 ट्रान्झीट टीम तसेच स्टेट हायवे व नॅशनल हायवेवर पाच तसेच तीन मोबाईल टीमद्वारे 21 हजार 547 बालकांना पल्स पोलिओ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते तर सोमवारपासून पाच दिवस घरोघरी जावून पडताळणी केली जाणार आहे तसेच ज्या बालकांना लस घेतली नाही, अशांना पोलिओ पाजला जाणार असल्याचे डॉ.किर्ती फलटणकर म्हणाल्या.