Ujani Extended The Devotee’s Bike From Outside The Dargah बोदवड : तालुक्यातील उजनी दर्ग्याबाहेर लावलेली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी गुरुवार, 1 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास लांबवली.
बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी बोदवड पोेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तथा चालक शे.आरीफ शे.उस्मान (28, अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) यांनी उजनी दर्ग्याबाहेर त्यांची दुचाकी (एम.एच.19 ए.एम.8221) लावली असता चोरट्यांनी गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ती लांबवली. तपास कॉन्स्टेबल शशीकांत महाले करीत आहेत.