नियंत्रण रेषेच्या पलीकडे ३०० दहशतवादी लपून बसले आहे-लष्करप्रमुख

0

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या पलिकडे जवळपास ३०० दहशतवादी लपून बसले आहे, अशी माहिती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.

दिल्लीत पत्रकार परिषदेत लष्कर प्रमुखांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. त्याठिकाणी शांतीसाठी फक्त आम्हीच माध्यम आहोत. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.

तालिबान प्रकरणाची तुलना जम्मू-काश्मीरसोबत होऊ शकत नाही. जर कोणता देश तालिबानसोबत चर्चा करत असेल आणि भारत अफगानिस्तानसोबत चर्चा करण्यास सकारात्मक असेल तर आम्हाला यामध्ये सामील झाले पाहिजे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले. भारतीय लष्कराच्या नॉर्डर्न कमांडला येत्या 20 जानेवारीला नवीन स्नायपर रायफल्स मिळणार असल्याचीही माहिती यावेळी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली.