303 फूट उंचीचा कोल्हापुरात ध्वजस्तंभ

0

कोल्हापूर । महालक्ष्मीचे दर्शन आणि रंकाळा तलावाची सर. हे म्हणजे कोल्हापूरचे पर्यटन , पण देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारी आणखी एक प्रभावी खूण या नगरीत उमटत आहे. तब्बल 303 फूट उंचीचा राज्यातील सर्वात उंच तर देशातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च ध्वजस्तंभ येथष उभा राहतोयं. महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, पन्हाळासह कोल्हापुरी गूळ, चप्पल, दागिने, तांबडया-पांढर्‍या रश्श्यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहेच. ध्वजस्तंभाची उभारणी झाली असून, शनिवारी स्तंभास ध्वज बसवण्याचे काम झाले.

चंद्रकांत पाटलांचा पुढाकार
नोव्हेंबर 2016 मध्ये पोलीस मुख्यालयात झालेल्या बठकीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वजस्तंभाची संकल्पना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या व अवघ्या महिन्याभरातच कामास प्रारंभ झाला आणि पाच महिन्यांत हा स्तंभ उभा राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 मे रोजी त्याचे अनावरण होणार आहे.
ध्वजस्तंभ नवे पर्यटन केंद्र
कोल्हापूर पर्यटकांचे आवडते केंद्र आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण योजना आखल्या आहेत. सर्वाधिक मोठा ध्वजस्तंभ पाहण्यासाठी कोल्हापुरात पर्यटक येऊ लागले तर येथील हॉटेल, लॉज, रिक्षाचालकांना अच्छे दिन येतील. देशात वाघा बॉर्डर (आटरी) 350 फूट, कोल्हापूर 303 फूट, रांची (झारखंड) 293 फूट, तेलंगणा 291 फूट, रायपूर (राजस्थान) 269 फूट, फरिदाबाद (हरयाणा) 250 फूट, कात्रज (पुणे) 237 फूट उंचीचे ध्वजस्तंभ आहेत.