31उपवासाची 15 रोजी पचकावनी

0

चोपडा। येथील सुधर्म आराधना भवन येथे चार्तुमासनिमित्त अनेक धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे. 1008 आचार्य पूज्य श्री रामलालजी मसा यांच्या सुशिष्या पूज्य श्री आदर्शप्रभाजी मसा ठाणा 6 चार्तुमासार्थ वास्तव्यास आहेत. दररोज आध्यात्मिक प्रवचन, पाठशाला,2 अतिक्रमण, धर्म चर्चा आदी माध्यमातून अबालवृध्द लाभ घेत आहेत.

समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन
जैन धर्मातील अत्यंत कठोर अशा तपस्या मध्येही अनेकविधी भाविक लाभ घेत असून चोपडा येथील व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष सुनिल बरडीया यांच्या पत्नी पुष्पा बरडीया या मासखमण (31) उपवास केलेले आहे. 15 ऑगस्ट रोजी पचकावनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महान तप साधनेचा गौरव करण्यासाठी सुधर्म आराधना भवन येथील कार्यक्रमात भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संघपती साहेनराज टाटीया व गुलाबचंद देसर्डा आदी मान्यवरांनी केलेले आहे.