31 गायींना मिळाले कत्तलीपासून जीवदान

0

शिंदखेडा । धुळे जिल्ह्यात चझ बॉर्डर, सांगली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पळासनेर गावापासून आत पटेलच्या जागेत 70 ते 80 गायी व बैल कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आहेत. त्याठिकाणी आत्ता जनावरे भरण्यासाठी टेम्पो आलेले असल्याची माहिती धुळे जिल्ह्यातील मानद पशुकल्याण अधिकारी जितेंद्र पाटील यांनी शिवशंकर स्वामी यांना दिली स्वामी यांनी पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क करुन कारवाईची मागणी केली. सांगवी पोलिसांनी सदर ठिकाणाहून गायी व बैल भरुन आलेला एक आयशर टेम्पो नं ाह.19.6007 यामधील 7 गोवंश ताब्यात घेऊन जागेवर छापा टाकला त्यावेळी त्याठिकाणी कत्तलीसाठी बांधलेली 24 गायी व बैल मिळून आले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन 31 गोवंश सुखरुप गोशाळेत सोडण्यात आली. यावेळी गोवंश रक्षा समिती सुभाष मालू, संजय शर्मा, पवन मराठे, अमोल पवार, डॉक्टर योगेश पाटील इ गोरक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.