शिंदखेडा । शेतकर्यांनी तालूक्यात अनेक गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणी टंचाई लक्षात घेता तालूक्यात 31 गावांसाठी 37 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत तर सहा गावांना टॅकरने पाणी पूरवठा सुरू आहे. तसेच सोनशेलू येथील टॅकरने पाणी पूरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव उपविभागिय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. विटाई व मेलाणे येथे टॅकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी तालूका प्रशासनाकडे केली आहे. माजी प.स.सभापती व उपसभापतीपद असलेले शिवसेना पक्षाचे तालूका प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या भडणे गावाला सुध्दा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावाला अधिग्रहित विहिरीवरून पाणी पूरवठा होत आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी टंचाई वर कायम तोडगा काढण्याची मागणी केली.
टॅकरद्वारे पाणी पूरवठा
वारूड, पथारे, भडणे, चूडाणे, वरूळ घुसरे, वाघाडी बु., आदी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यांतील वारूड गावाला ऑक्टोबर 2015 पासून कोणताही खंड न पडता टॅकरने पाणी पूरवठा सुरू आहे. यात शासनाचे लाखो रूपये खर्च झाले आहेत. या गावाला कायम स्वरूपी पाणी पूरवठा योजना होण्यासाठी प्रयत्न होत नसल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ललीत वारूडे हे वारूड गणातील प.स. सदस्य असून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे यांचे निकटवर्ती आहेत, तरीही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
अनेक वर्षापासून टंचाई
पथारे या गावाला देखील ऑगस्ट 2016 पासून, भडणे गावाला सप्टेंबर 2016 पासून, चूडाणे गावाला एप्रिल 2017, वरूळ घुसरे मे 2017, वाघाडी बु. ऑगस्ट 2017 पासून या गावांना टॅकरने पाणीपूरवठा होत आहे. दरखेडा, वायपूर, सोनशेलू, निरगुडी, खर्दे खु., विटाई, मेलाणे, सोनशेलू या गावांना टॅकरने पाणी पूरवठा करण्याचा प्रस्ताव शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ पाणी टंचाई संर्दभात बैठक घेवून पाणी टंचाईची सद्यस्थिती, होणारी उपाययोजना व भविष्यातील पाणी टंचाई निवारणार्थ नियोजनासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी टंचाई ग्रस्त गावातील नागरीकांनी केली आहे.
अधिग्रहित गावे व विहिर
वर्शी(1), सुराय (2), चुडाणे (1), अक्कलकोस (1), कलवाडे (1), मालपूर (1). नरडाणे (1), पथारे (1), पिंपरखेडा (1), सार्वे (1), वणी (1), वारूड (1) धावडे (1) वायपूर (2), जोगशेलू (1), झिरवे (1) भडणे (2), माळीच (1) हातनूर, ( 1) वाघाडी बू.(1), वरूळ घूसरे (1), रामी (2), मांडळ (1) जातोडा (2), दलवाडे प्र.न.(1), चौगाव बु.(1), चौगाव खु.(2), कंचनपूर (1), विरदेल (1), बाभुळदे (1), वालखेडा(1) आदी गावात विहीरी अधिकग्रहीत करण्यात आल्या आहेत.