31 लाखांचा अपहार; तिघे अटकेत

0

भुसावळ। येथील सरकी ढेप उत्पादीत करणार्‍या बालाजी इंडस्ट्रीजमधील अकाऊंटंट, सुपरवायसर तसेच वाचमन या तीघांनी संगनमताने ढेपच्या 1 हजार 970 पोत्यांची 31 लाख 52 हजार रुपयांमध्ये परस्पर विक्री करुन आलेली रक्कम आपसात वाटून घेतल्याचे उघडकीस आल्याने तीघांना अटक करण्यात आली आहे. गजबजलेल्या इंडस्ट्रीत कंपनीच्याच स्टाफने केलेल्या चोरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

परस्पर विक्री करून फसवणूक
बालाजी सरकी ढेप इंडस्ट्रीजमधील अकाऊंटंट मनोज रमेश अग्रवाल (रा. गांधी चौक, भुसावळ), सुपरवायसर सतीश राधेश्याम मंत्री (रा. सुरभी नगर) व वॉचमन बाबू प्रधान (रा. चोरवड, ता. भुसावळ) या तीघांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून 1 हजार 600 रुपये प्रमाणे सरकी ढेपचे 1 हजार 970 पोती एकमेकांच्या सहाय्याने परस्पर विक्री करुन कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी विजय रामेश्‍वर अग्रवाल यांनी तालुका पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरुन तीघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील करीत आहे.