शिरपूर : शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे पाणीपुरी खाल्याने ३१ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. सर्व रुग्णावर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ३ रोजी १०.३० वाजता आमदार काशिनाथ पावरा यांनी भेट घेवुन विचारपुस केली. तालुक्यातील भटाणे येथे २ रोजी अनेकांनी पाणीपुरी खाल्ली रात्री उशीरा त्यांना उलट्या व जुलाब होवु लागल्याने सोळा मुले तीन मुली सहा महिला सहा पुरुष असे ३१ जणाना दाखल करण्यात आले तर येथील इंदीरा मेमोरीयलला सहा जणांवर उपचार सुरु आहेत सर्व रुग्णांवर वैद्यकीय अधिक्षक ध्रुवराज वाघ यांच्या टिमने उपचार केले दरम्यान, ३ रोजी सकाळी १०-३० वाजता आमदार काशिराम पावरा, तसिलदार प्रशांत पाटील, विनायक कोळी, श्यामकांत ईशी, अमोल पाटील, देवेद्र राजपुत आदींनी रुग्णालयात जावुन रुग्णांची चौकशी केली.