भुसावळात विशेष पथकाची कामगिरी ; कारवाईचा अनेकांना धसका
भुसावळ- फुकट्या रेल्वे प्रवाशांसह नियमबाह्य प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने मोहिम उघडली असून गुरुवार, 7 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 317 प्रवाशांकडून तब्बल एक लाख 50 हजार 120 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही मोहिम वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.सी.) अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
धडक कारवाईने उडाली खळबळ
30 तिकीट निरीक्षक व चार रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांसोबत गुरुवारी दिवसभर राबवण्यात आलेल्या मोहिमेत विना तिकीट प्रवास करणार्या 104 प्रवाशांकडून 46 हजार 110 रुपयांचा दंड तसेच रीझर्व्ह डब्यातून जनरल तिकीटावर प्रवास करणार्या तब्बल 200 प्रवाशांकडून एक लाख एक हजार 560 रुपयांचा दंड तसेच सामानाची बुकींगविनाच वाहतूक करणार्या 13 प्रवाशांकडून दोन हजार 450 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे एल.आर.स्वामी, ए.आर.सुरवाडकर, बी.एस.महाजन, के.के.तनती, एस.के.सत्तार, एन.पी.पवार, एन.पी.अहिरराव, हेमंत सावकारे, ए.एस.राजपूत, प्रशांत ठाकुर, अमित शर्मा, मुन्ना श्रीवास्तव, डी.के.त्रिवेदी, आनंदा शिंदे, डी.डी.बडगुजर, धीरज कुमार, वाय.डी.पाठक, शेख जावेद, योगेश न्हावकर, उमेश कलोसे व तिकीट निरीक्षक सहभागी झाले.