32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग : आरोपी तरुणाविरोधात गुन्हा

जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणार्‍या तरुणाविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लज्जा उत्पन्न होईल असे केले वर्तन
जळगाव तालुक्यातील एका गावात 32 वार्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. 2 मार्च रोजी महिला रात्री नऊ वाजता शौचालयासाठी जात असताना संशयीत आरोपी धम्मा मुकुंद महाले या तरुणाने विवाहितेचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने शुक्रवार, 4 मार्च रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहेत.