32 विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात गणेश चतुर्थींचे औचित्य साधून 26 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात 32 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. हे शिबिर राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांच्या सहकार्याने घेण्यात आले होते. यावेळी डॉ.कोल्हे, वसतिगृहाचे रेक्टर डॉ.जितेंद्र नारखेडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पद्माकर कोठावदे, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.