32 हजारांचे लाच प्रकरण : रावेरातील वजन मापे निरीक्षक पोलिस कोठडीत

One day police custody for bribed weighing inspectors in Rawer रावेर : पेट्रोल पंपावरील चार नोझल मशीन्स स्टॅपींग करून प्रमाणपत्र देण्यासाठी रावेरातील वजनमापे निरीक्षक सुनील रामदास खैरनार (56, रा.एमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर) यांना 32 हजारांची लाच स्वीकारताना मंगळवारी दुपारी तीन वाजता जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. खैरनार यांना बुधवारी दुपारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लाच स्वीकारताच केली होती अटक
रावेर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भुसावळातील तक्रारदाराचा एस.एस.बिंबे अ‍ॅण्ड सन्स पेट्रोल पंप असून त्यांनी तो 11 महिन्यांच्या कराराने चालवण्यास घेतला आहे. पंपावरील चार नोझल मशीन्स स्टॅपींग करून प्रमाणपत्र देण्यासाठी मंगळवारी आरोपी तथा वजनमापे निरीक्षक सुनील खैरनारे याने 32 हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. संशयीत आरोपी पंपावर लाच घेण्यासाठी दुपारी तीन वाजता आल्यानंतर पंचांसमक्ष आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक जनार्धन चौधरी, नाईक किशोर महाजन, नाईक बाळू मराठे, नाईक सुनील वानखेडे, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वी केला होता.