शहादा । तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील ग्रामपंचायतीला संतगाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान अंतर्गत यावर्षी जिल्हात प्रथम क्रमांक मिळविल्याने सरपंचासोबत सर्व सदस्यांच अभिनंदन करण्यात येत आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच ज्योतीबाई पाटील व ग्रामसेवक शरद पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देवून सन्मानित करण्यात आले पुरुषोत्तम नगर ही ग्रांपचायत ही 100 टक्के महिला ग्रामसदस्यांची आहे. गेल्या 15 वर्षांपासून निवडणूक बिनविरोध होत आहे. जिल्ह्यात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून लौकिक आहे. आतापर्यंत ही ग्रामपंचायत अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात येणार आहे.
सरपंचासोबत सदस्यांचे केले अभिनंदन
विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीने गावात व्यसनमुक्ती मोहीम राबविली आहे. गावात दारूबंदी केली आहे जवळजवळ हगणदरीमुक्त गाव केले आहे. महिलांसाठी सर्वात जास्त उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत आहे. चौकाचे सुशोभीकरण केले आहे. शुद्धपाणी पुरवठा योजना आहे. या पुरस्कारबाबर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगरसेवक प्राचार्य मकरंद पाटील, कमलाताई पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.कलशेटी. जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी मंगळे सातपुडा साखरकारखाना कार्यकारी संचालक पी.आर.पाटील प्रवीण पाटील, कृउबा सभापती सुनील पाटील. दूध संघाचे चेअरमन रविन्द्र रावल यांनी अभिनंदन केले.