325 वर्षांची परंपरा असलेला सिंदखेड्याचा श्रीराम जन्मोत्सव रद्द

0

शिंदखेडा (प्रतिनिधी) : येथील श्रीराम बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने सुमारे सव्वातीनशे वर्षापासून तह्यात पणे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम 2 एप्रिल रोजी संपन्न होणार होता सदरचा कार्यक्रम कोरोना covid-19 च्या देशभर लागलेल्या महामारी मुळे रद्द करण्यात आल्याची माहिती श्रीराम बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण मेघशाम बुवा महाराज यांनी दिली आहे.

                  याबाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की सकळ भाविकांना कळविण्यात येते की सर्वत्र कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना जीवित आणि या रोगामुळे होत आहे संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर यावर उपाययोजना सुरू आहेत व शासनाने लोकडाऊन केले आहे कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढून नये यासाठी शासनाने यात्रा उत्सव सण यांच्यावर निर्बंध घातले असून शासन प्रशासनाच निर्देश पाळावेत म्हणून वारकरी संप्रदायाच्या श्रीराम जयंतीचा यंदाच्या कार्यक्रम यावर्षी खंडीत होत असून सुमारे सव्वा तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री बालाजी संस्थानच्या श्रीराम जन्मोत्सव हा ऐतिहासिक महत्त्व आहे
कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनानुसार यावर्षीचा श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम खंडित करीत असल्याची माहिती बालाजी संस्थानाचे मठाअधिपती ह-भ-प मेघशाम महाराज बुवा यांनी दिली आहे चैत्रशुद्ध 9  रोजीचा 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेला कीर्तन महोत्सव व श्रीराम जयंती कार्यक्रम यावर्षी खंडित करण्यात आला आहे तथापि नागरिकांनी व प्रभू श्रीराम भक्तांनी आपापल्या घरोघरी 2 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव आपल्या आपल्या परीने यथाशक्ती साजरा करावा व प्रभू रामाचे पूजा करावी असे आवाहन संस्थानचे मठाधिपती ह-भ-प मेघशाम महाराज यांनी केले आहे