33 हजार क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम पाडले

0

पुणे । महापालिकेच्या बांधकाम विभागाने हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर अशा ठिकाणातील तेहतीस हजार क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम शुक्रवारी पाडले. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

कोरेगाव पार्क येथील मन्सूर आली टेरेस हॉटेलचे तीन हजार चौरस फूट, हॉटेल प्रेम यांचे साडेनऊ हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले. वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द व हिंगणे खुर्द परिसरातील हॉटेल स्वराज, हॉटेल ग्रीन फिल्ड, हॉटेल कामत मीरा, हॉटेल गिरीजा यांचे 12 हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. कोंढवा बुद्रुक येथील हॉटेल गोकुळ, हॉटेल कान्हा, हॉटेल रंगीलो राजस्थान यांच्या हद्दीतील बांधकामे पाडण्यात आली.आंबेगाव बुद्रुक येथील हॉटेल पीजे, हॉटेल श्री श्री प्युअर व्हेज यांचे बाधकाम कारवाईत पाडण्यात आले.