रेल्वे प्रवासात पॅरा अ‍ॅथलीटचा लोकांच्या पायांजवळ झोपून प्रवास

0

नवी दिल्ली । दिव्यांग क्रिकेट आज भारतामध्ये अशा अनेक खेळाडूंसमोर एक आशेचा किरण आहे, जे क्रिकेटच्या माध्यमातून आपले जीवन बदलू पाहत आहेत. पण, या खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. जेव्हा नागपूरहून दिल्ली असा रेल्वेने प्रवास करणार्‍या पॅराअ‍ॅथलीट सुवर्णा राज हिला रेल्वेत खाली चादर टाकून लोकांच्या पायांमध्ये झोपून प्रवास करावा लागला. आंतरराष्ट्रीय खेळाडू सुवर्णा राज यांनी दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेत जागा आरक्षित केली होती. अपंगांच्या कोट्यातून रिझर्वेशन झाल्यानंतरही त्यांना रेल्वेने चक्क अप्पर बर्थ दिले.

सुरेश प्रभूंकडे करणार तक्रार
त्यामुळे, या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलीटला रेल्वेत खाली चादर टाकून लोकांच्या पायांमध्ये झोपून प्रवास करावा लागला. हे सांगताना सुवर्णा यांचे डोळे पाणावले होते. जर रेल्वेने त्यांना लोअर बर्थ दिली असती तर असे झाले नसते, असे सुवर्णा म्हणाल्या. या प्रकरणानंतर सुवर्णा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना भेटून झालेल्या त्रासाबद्दलची तक्रार करणार असल्याचेही तिने सांगितले आहे.