पुणे । टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्याला सुरा लावून चार इसमांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल चोरून नेल्याची प्रकार उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी 6.30च्या सुमारास कोथरूड परिसरातील एआरएआय रोडवरील टेकडीवर घडला. याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सायंकाळी म्हातोबा टेकडीवर फिरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्याजवळ अचानक आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यास सुरा लावून गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा 34 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाखडे अधिक तपास करीत आहेत.