34 हजार कोटी कर्जमाफी ही अंदाजे!

0

मुंबई : राज्य शासनाने 25 जून 2017 छत्रपती शिवाजी महाराज कषी सन्मान योजनेमध्ये 34 हजार 22 कोटी मान्य केलेली रक्कम ही अंदाजे असल्याचे सांगत बँकांकडून माहिती आल्यानंतरच याबाबत स्पष्ट आकडेवारी आपल्यासमोर येणार आहे असे निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदन सादर केले.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रूपये मान्य रक्कम ही अंदाजे आहे. माध्यमांनी आणि सभागृहात काही सदस्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या पैशावर डल्ला मारला असल्याचे सांगितले आहे. परंतु पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रूपयांची तरतूद आहे. एक हजार कोटी आदिवासी विभागाचे घेतले असल्याचे बातम्या होत्या परंतू त्यांच्या निधीतून हे पैसे घेतले नाहीत. अनुसुचित जातीच्या कल्याणासाठीचे पैसे वेगळे असून त्याचा कर्जमाफीसाठी वापर करण्यात आला नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.