34 वर्षीय गुराखी तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

The body of a 34-year-old youth from Yawal city was found in a Well यावल : शहरातील देशमुख वाड्यातील 34 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तरुण दोन दिवसांपूर्वी आपण नातेवाईकांकडे जात आहोत. असे सांगून घराबाहेर पडला मात्र जुन्या अट्रावल रस्त्यावरील शेत विहिरीत तो मृतावस्थेत आढळला. विनोद गोविंदा खैरे (34, देशमुखवाडी, यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे.

मृत्यूच्या कारणांचा शोध
विनोद हा तरुण शेळ्या, बकर्‍या चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपूर्वी आपण नातेवाईकांकडे जात आहोत. असे सांगून तो घरून निघाला मात्र रविवारी त्याचा मृतदेह जुन्या अट्रावल रस्त्यावर असलेल्या देवराम राणे यांच्या शेतातील विहिरीत आढळला. यावल पेालिसांनी मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. ग्रामीण रुग्णालयात डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मयत खैरे हा 108 रुग्णवाहिकेचे चालक संदीप खैरे यांचा भाऊ होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.