धानोरा । ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत लाभार्थ्यांची यादी वाचन करण्यात आले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विकास महाजन हे होते. सभेचे यादी वाचन ग्रामसेवक दिपक भामरे यांनी केले यात लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष रु . पाच लाख पर्यंत आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. यात 343 लाभार्भी असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
ही योजना सुरु झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनां देशाअंतर्गत सर्व अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार असुन यात 343 लाभार्थीनां आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे. या ग्रामसभेप्रसंगी सरपंच विकास महाजन, ग्रा.प. सदस्य किशोर महाजन, रमेश पाटील, अंकिता पाटील, अरुणा पाटील, दामु भील, व्ही .सी. पाटील, राजेश महाजन, गुलाब पाटील, विनायक पाटील, विजय पाटील , सुनिल पाटील, अतुल पाटील, बापु महाजन, गुलाब महाजन, आसाराम पाटील, अरूण पाटील, महेश साळुंके, आरोग्य सेवक प्रेमराज सोनवणे, आशा वर्कर वंदना मोरे, सुनिता मोरे, शिपाई रविंद्र पाटील, हिरामण ढिवरे आदी सहगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.