रेडक्रॉसतर्फे चोपडा तालुक्यात आदिवासीबांधवांना कपडे वाटप

0

जळगाव । रेडक्रॉसतर्फे चोपडा तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या जंगल भागातील रहिवाशांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, उपाध्यक्ष गनी मेमन , श्वेता शालिनी, आसिफ मेमन, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, राजेश यावलकर, घन:श्याम महाजन, डॉ. रितेश पाटील, अरविंद देशमुख, अँड. प्रदीप कुलकर्णी, उज्व्वला वर्मा, सरिता महाजन, अमित माळी, प्रेमराज पाटील, लक्ष्मण तिवारी, अन्वर खान, प्रसाद चित्ते, धर्मेंद्र टेमकर राकेश शांताराम पाटील आदी उपस्थित होते.

महिला, लहान मुले, तरूणानी घेतला लाभ
हा कार्यक्रम कुंड्यापानी, अर्जुन पाडा, चांदन्यातलाव, पान शेवडी, नरावस्ती, मनयावस्ति, रामजीपाडा, पांढरी वस्ती इत्यादि पड्यावर राहणारे हजारो आदिवासी महिला परिवारासह, धानोर्‍याच्या पुढे पाड्यावरील पटांगणात घेण्यात आला. रेडीमेड कपडे जसे 700 साडी, 150 पँट शर्टस, टी शर्ट्स, 150 ब्लंकेट्स, 700 बेड शीट्स, 700 टॉवेल, 400 टॉप्स, 100 स्वेटर इत्यादिचे वाटप करण्यात आले.

सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हा
गनी मेमन यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले की, रेडक्रॉस वेळोवेळी मदतीचा हात देत राहील व आरोग्य सेवेचाही उपक्रम राबविला जाईल, शिक्षणासाठी मदत केली जाईल व आदिवासी हे पूर्वकाळापासून संस्कृतीची जोपासत करीत आहे त्याची प्रशंसा केली. सर्वांनी सेवाभावी उपक्रमात सहभाग द्यावा असे आवाहन केले.

डोळे तपासणी शिबीर
यावेळी जी.एम. फाऊंडेशन च्या वतीने या आदिवासी बांधवांचे डोळे तपासणी शिबीर ही घेण्यात आले. त्यात मोतीबिंदू आढळलेल्या जवळ जवळ 30 रुग्णांना ऑपरेशन साथी ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे आणले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच नुमबर आढळलेल्या रुग्णांना पुढील काही दिवसात चष्मे वाटप करण्यात येईल.