जखमीच्या कुटुंबीयांना हॉकर्स संघटनेतर्फे 20 हजारांची मदत

0

जळगाव । विज रोहीत्राचा शॉक लागल्याने शहरातील हॉकर्स विशाल दादाराव शिंदे हा जखमी झाला होता. त्यांच्याकुटुंबीयाला फुले मार्केेट हॉकर्स संघटनेतर्फे 20 हजाराची मदत करण्यात आली आहे. संघटनेच्या सदस्यांनी सार्वजनिक वर्गणी करत जमा झालेल्या रकमेचा धनादेश विशालची आई मालूबाई व भाऊ बंडू शिंदे यांना सुपुर्द करण्यात आला. यावेळी अध्यक्ष नंदु पाटील, अब्दुल शेख, जितू वाणी, बापू चौधरी, तन्वीर अली, रवि चौधरी आदी उपस्थित होते.