साकेगाव । येथील ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित मानाच्या सरपंच चषक स्पर्धेसाठी यंदा 20 संघांनी सहभाग नोंदविला असून या स्पर्धेला रविवार 15 पासून सुरुवात होणार आहे.
सरपंच चषक प्रिमियर लीग सिझन 3 साठी गावातील 20 संघांच्या 250 पेक्षा जास्त खेळाडूंमध्ये सरपंच चषक पटकाविण्यासाठी कमालीची रस्सीखेच सुरु असून यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तरुण वर्ग भर थंडीत कसून सराव करीत आहे. मैदानावर खेळाडूंमध्ये स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. विजेत्या संघाला ग्रामपंचायततर्फे 11 हजार तर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेकडून पाच हजार रोख बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाची तयारी करण्यात आली असून यशस्वीतेसाठी उपसरपंच शकिल पटेल, माजी सरपंच अनिल पाटील यांसह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी परिश्रम घेत आहे. तसेच समिती गठीत करण्यात आली असून आनंद ठाकरे, वासेफ पटेल, अजय चौधरी, गोपाळ पवार, प्रमोद पाटील, प्रविण पवार, नरेंद्र पाटील, रमजान पटेल, विलास ठोके, प्रमोद चव्हाण, राजू भोईटे, भूषण पवार, सचिन राजपूत, योगेश भोई, इंदल परदेशी यांचा समावेश आहे.